-
(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म.-६
(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान .तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षम पाने तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म-७ .
(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढावून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो .भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो .सुखी भावना जर सुखी करते तर सर्व च भावना सुखकारक करण्या साठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.-८
(९) सत्य जाणून घेणे. वस्तू स्थिती हि सत्य व माया हि असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवशक असतेच म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.-९
(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते , अन्य कोठे हि नसते .नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढुन टाकायला शिकवणारे शास्त्र आणी मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते मग त्या आनुशंघाने परमेश्वराच्या सानिध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म -१०
(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो अशा द्वैता कडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही,केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेला च असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म
(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.(१३) देह बुद्धीच्या पलीकडे जाणे/ स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रणमान असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म.देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे याने काही नुकसान न होता अध्यात्मा त प्रगतीचे असणारे पहिले महत्वाचे पाउल आहे..