-
मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म. अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे.प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे. आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे!
(१५) अध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतुन ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दुर करण्याच्या प्रयत्नात असते आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे.पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मात हि प्रतिस्पर्धी हवा.
(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म.अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्या चे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म.
(१७) वरील १६ व्याख्यांपैकी ................. काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे कि- ज्याला पैसा लागत नाही ते म्हणजे आध्यात्म..प.पु. ब्रम्ह चैतन्य.महाराज म्हणतात परमेश्वरावर विनाकारण प्रेम करायला पैसा लागतो का?..म्हणजे परमेश्वरावर अकारण प्रेम करणे म्हणजे अध्यात्म.